Bhimsurya Krantichaa Bhimsong Lyrics
Song: Bhimsurya Kranticha
Singer: Anand Shinde
भीमसूर्य क्रांतिचा,
पाहिला विधानात
बुद्ध ज्याने दावीला,
पिंपळाच्या
पानात
पाडली अशी खाली,
माज़लेली विषमता
दाव होते समतेचे,
भीम पहिलवानात
जात पोड़ली माझी रूढ़िच्या निखार्यावर
फूल आले क्रांतिचे,
या वाळलेल्या
रानात
गावकिचा जोहार, संपला आता माझा
दिल्ली आम्ही पाहिली,
त्या भीम संविधानात
बाटली बैलगाड़ी काल आमच्या स्पर्शाने
मी टाय कोट घालूनी,
आता चाललों विमानात
बुद्धिच्या किनार्यावर विश्व तू चकित केले
ओsss, बुद्धिच्या सागरात मंथन भीमात होते
समतेच्या भावनातिल चंदन भीमात होते
तालात जीवनाच्या विषमता नाचली ही
न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते
संकल्प या मनाचा,
क्रांति करून गेला
निधड्या मनाचा मोठा होउन सिंह गेला
दीपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने
इतिहास घड़विला माझ्या उगंधराने
ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची
फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची
दुखाला झेलनारा काळाला छेदनारा
गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंझणारा
विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला
भीमराव माणसाला माणूस करून गेला
काळाच्या
डोळ्यावरती बसलेली होती कात
तू दाविली पहाट उज्वल प्रखर ती ज्योत
न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता
या दिन बंधवाना आदर्श तुझा होता
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले
दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले
बुद्धिच्या किनार्यावर विश्व तू चकित केले
पाहिला महासागर,
तो पाहिला महासागर
पुस्तकाच्या ज्ञानात
बुद्ध ज्याने दावीला,
पिंपळाच्या
पानात
भीमसूर्य क्रांतिचा,
पाहिला विधानात
1 Comments
https://buddhabhimsongs.blogspot.com/2025/12/vip-rahan-ambedkar-song-lyrics-sajan-bendre.html
ReplyDelete