Mala Tujhya Rakta Madhla Bhim Pahude full Bhimgeet Lyrics

Mala Tujhya Rakta Madhla Bhim  Pahude full  Bhimgeet Lyrics

Mala Tujhya Rakta Madhla Bhim  Pahude full  Bhimgeet Lyrics

Song: Mala Tujhya Rakta Madhla Bhim  Pahude
Singer: Bhagyashree Ingle
Lyrics: Kavi Keval Kavle
Music: Hiral kamble


अरे समाजाच्या साठी तुझ रक्त वाहु दे

अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे

अन पैदा हाऊ दे असा तू पैदा हाऊ दे

अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे

 

रोज मरते इथे जनता भोळी

होते कोनाच्या जीवनाची होळी

राजकरत्याला लाज नाही थोडी

त्याच निखार्यावर शेकतात पोळी 

कुणी नावासाठी झुरताना पाहिले

अहो घर आपलेच भरताना पाहिले

ज्याने धोका दिला बा भीमाला

पाय त्याचेच धरताना पाहिले

 

अरे जाग येऊ दे तुला रे जाग येऊ दे

अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे

 

कार्य भीमाचे तव हातून घडतील

तुला पाहून वैरी ही जळतिल

साम दाम दंड भेदाने छळतिल

तुझ्या छातिवरी गोळी कोणी झाडतील

तुझ्या धैर्याने लोक जेव्हा जुळतील

समता न्याय हक्का साठी झगड़तील

क्रांति कराया तुटुन पड़तील

तवा वैर्याचे अवसान गळतील

अन होउन जाऊ दे असा तू होउन जाऊ दे

अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे

 

भीमराया चा तू शूर शिपाई

वैर्या तपती लढ़ाया लढाई

तुझा निर्धार खंबीर असावा

त्यात स्वार्थीपना ना दिसावा

अरे तुझ्या विचाराचा क्रांतिकारी रान पेटु दे

अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे

 

कुणी कुनाचा उरलाच न्हाय

कवि केवळ आहे का उपाय

एक दुसर्याचे ओढ़नारे पाय

रथ भीमाचा हाकतील काय

मर्द तोच खरा भीमाच्या पोटी

भीम रथाची वाढवितो गती

त्याची वाघाच्या बछड्याची छाती

त्याला मरनाची वाटे ना भीती

अन पैदा हाऊ दे असा तू पैदा हाऊ दे

अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे

❤❤❤

Post a Comment

0 Comments