Tujhech Dhamma Chakra he Fire Jagavari is beautiful Buddhageet song sung by singer Ravindra Sathe. Music is composed by Yashvant deo and the lyrics is written by Suresh Bhatt. Enjoy the lyrics of the song Tujhech Dhamma Chakra he Fire Jagavari only on Bhim-Geetmaal.
Song Details:
Song: Tujhech Dhamma Chakra he Fire Jagavari
Singer: Ravindra Sathe
Lyrics: Suresh Bhatt
Music: Yashvant Deo
तुझ्याच गौतमा पडे प्रकाश अंतरी
तुझ्याच गौतमा पडे प्रकाश अंतरी
तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी
बुद्धं शरनं गच्छामी, धम्मम शरनं गच्छामी, संघं शरनं गच्छामी
कळ्या कळ्या, फुले फुले, तुला निहाराती
पहा तुझीच चालली नभात आरती
तुला दिशा निहाळती यशोधारे परी
तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी
तुझ्या मुळेच जाहला अखेर फैसला
दिलास धीर तोडल्या आम्हीच शृंखला
आता भविष्य आमचे असे तुझ्या पुरी
तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी
तुलाच दुख आमुचे तथागता कळे
तुझीच सांत्वणा आम्हा क्षणो क्षणी मिळे
निनाद पंचशीलचा घुमे घरोघरी
तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी
तुझ्या मुळेच मार्ग हा आम्हास लाभला
तुझ्या मुळेच सूर्य हा पुन्हा प्रकाशला
तुझेच सत्य या पुढे लढेल संगरी
तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी
तुझ्या समान एक ही नसे तुझ्या विना
सदैव या पुढे करू तुझीच वंदना
झुरेल अमृता परी तुझीच वैखरी
तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी
0 Comments