Pidhya Pidhya Pasuni Kasa Sahila Vital is the latest song from shindeshahi duo regarding to the current situation of corona pandemic and how dalit people suffered so much in the past and how these two situations are not so different Hope you enjoy the lyrics of this wonderful song Pidhya Pidhya Pasuni Kasa Sahila Vital by Utkarsh shinde and Adarsh shinde.
Singer: Dr UTKARSH A SHINDE
Music: Utkarsh-Adarsh
Song Concept: Dr Utkarsh A Shinde
Lyrics: Pranay Satalaj , Dr.Utkarsh A Shinde
Label: VijayaAnandMusic pvt ltd
Producer: Vijaya Anand Shinde
Executive Producer: Harshad A Shinde
पिढ्या पिढ्या पासूनी
मी काल पर्वा पासूनी हा पाहतो टाळाटाळ
तुम्ही पिढ्या पिढ्या पासूनी कसं साहिला विटाळ
आमच्या त्या पूर्वजांनी तुमच्यावरी रे फार
जातीच्या नावावरती केलेत अत्याचार
कोरोना मुळे कळाले काय असतो दूरव्यवहार
सलतो कसा मनाला काय असतो बहिष्कार
आठवून लाज वाटे अस्पृशतेचा काळ
मी काल पर्वा पासूनी हा पाहतो टाळाटाळ
तुम्ही पिढ्या पिढ्या पासूनी कसं साहिला विटाळ
जळ झाले आम्हा जगणे हे मास्क लाऊनिया
जगलात तुम्ही कसे रे हे माठ लाऊनिया
आमचे आम्हारे देती लांबूनी अन्न आज
सारा आता उतरला आमचा तो खोटा माज
तोडू आता आम्ही रे विषमतेचा हा जाळ
तुम्ही पिढ्या पिढ्या पासूनी कसं साहिला विटाळ
तुमचा लढा कळाला पाण्याचा आम्हा आज
जेव्हा मिळाले पाणी आम्हा दुरूनी आज
चवदाराचे ते सत्य कळाले आम्हा आज
अत्यंत नीच होता जुना रूढी रिवाज
मनूस्मृतिला लाऊ कायमच आम्ही टाळ
तुम्ही पिढ्या पिढ्या पासूनी कसं साहिला विटाळ
तुमच्या त्या सावलीचा होता आम्हारे त्रास
कोणी न आज घेई आमचा हातात हात
जशी होती तुमची वस्ती गावाच्या त्या वेशीला
विलगीकरण हे आले आमच्या या नशिबाला
पेरील वैर आम्ही तोडून तुमची नाळ
तुम्ही पिढ्या पिढ्या पासूनी कसं साहिला विटाळ
माफी करा भावांनो आमच्या तुम्ही चुकांना
विसरून सारे वर्ण जानु रे माणसाला
तुमच्या समान थोडे भोगिले आम्ही आज
वंदन कराव वाटे त्या भीम चरणांना
प्रणयच्या सोबतीने उत्कर्षाची सकाळ
तुम्ही पिढ्या पिढ्या पासूनी कसं साहिला विटाळ
IF THERE IS ANY MISTAKE FEEL FREE TO COMMENT
THANK YOU
❤❤❤
DOWNLOAD THIS SONG HERE
0 Comments