Trisaranachi mangal wani bhimgeet lyrics | त्रिसरणाची मंगल वाणी
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
त्रिसरणाची मंगल वाणी घुमते मंगलधामी
एक संत असा कुलवंत कुलवंत आणि शिलवंत
शिलवंताची साथ मिळाली अखेरच्या मुक्कामी
सर्वास मिळावा वाटा असा ज्ञान धनाचा साठा
ठेवून गेला याच ठिकाणी उभ्या जगाचा स्वामी
ना शोध कुणाचा उसना दुःखाचे कारण तृष्णा
तोड तयावर सांगून गेला महान अंतर्यामी
गाऊन शीलाची गाथा जण म्हणती जाता जाता
इथेच नमतो माथा आता ज्ञान दुजे कुचकामी
आलीरे संधी नामी सांगितले वामनला मी
उचल पोतडी पंचशीलाची येईल आपुल्या कामी
listen to this song...