Mazya khambir netyan pani chakhlay talyach bhimgeet lyrics | माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं तळ्याचं

  • गीतलक्ष्मण राजगुरू
  • गायककृष्णा शिंदे

माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं ळ्याचं

माझ्या खंबीर नेत्यानं, पाणी चाखलं तळ्याचं

त्यानं जीवाच्या पल्याड, केलं राखण मळ्याचं

बोधिसत्त्वाच्या तत्त्वाचं, खत टाकीलं मळ्यात

त्याला कुंपण घातीलं, बुद्ध धम्माच्या आळ्याचं

बोध-अमृत शिंपून, मळा फुलविला त्यानं

नव जीवन घडविलं, कोटी फुलांचं कळ्यांचं

अष्टशीलाच्या कुपीत, असे भांडार ज्ञानाचं

भाग्य जागवी क्षणातदीक्षाभूमीच्या खळ्याचं

साऱ्या विखुरल्या फांद्यापानं लागली गळाया

नाही कुणी आता उरलं, भीमरायाच्या लळ्याचं

नवकोटीच्या संगतीनं, राजगुरुनं गळ्यात

बघा ताईत बांधीलं, भीम बुद्धाच्या नावाचं