Jivala Jivach Daan Majhya Bhiman Bhimgeet Lyrics

Jivala Jivach Daan Majhya Bhiman kel song is a bhimgeet lyrics by Shravan Yashvante and sung by singer Pralhad Shinde. Enjoy the Lyrics of Jivala Jivach Daan Majhya Bhiman kel bhimgeet.  

Jivala jivach daan mazya bhiman kel bhimgeet lyrics | जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं

Song: Jivala Jivach Daan Majhya Bhiman kel
Singer: Pralhad Shinde
Lyrics: Shravan Yashvante

जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं

  जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं

झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं


साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी
यश घेऊन आली भीमाची लेखणी
असं अमृताचं पान माझ्या भीमानं केलं


एका गरीब घरी जन्माला येऊन
तरी शिकावयाची जिद्द उरी घेऊन
अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं


आला कोलंबियाहून पी एच डी होऊन
दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊन
त्याचंच देशाला दान माझ्या भीमानं केलं


आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा
मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा
असं आम्हा बलवान माझ्या भीमानं केलं


राजदरबारी अशी केली कारागिरी
लोकशाहीचा धुरा लेऊन आपल्या शिरी
कायद्याचं कार्य महान माझ्या भीमानं केलं

❤❤❤

listen to the song Jivala Jivach Daan Majhya bhimaan kel...