Gautam buddhacha sandesh sangu chala re bhimgeet lyrics| गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे

गौतम
बुद्धाचा संदेश सांगू चला रे

 

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्-बुध्दस्स
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
बोध ज्ञानाचा, ज्ञानाचा देऊ चला रे

दुःख पापे जिथे, ऐसा नदीचा किनारा
मोह माया जिथे, ऐसा हा जीवन पसारा
       
शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा
विश्व शांतीच्या समतेची धारा

बोध सत्याचा, सत्याचा घेऊ चला रे
       
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे

क्रोध युद्धातूनी काही जगी ना उरावे
बंधू प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे
       
पंचशीलाच्या शब्दाची गाथा बोध शुद्धीच्या तत्त्वाची गाथा
बौद्ध धम्माच्या संघाची गाथा
दिव्य मार्गाने, मार्गाने जाऊ चला रे
       
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे

जीव त्यागातले श्रद्धेने विश्वात तरती
अहं ईर्षातले पापाच्या खाईत बुडती
       
हितशत्रुला प्रेमाने जिंका लोभ मोहाला त्यागाने जिंका
द्वेष क्रोधा संयमाने जिंका
महिमा धम्माचा, धम्माचा गाऊ चला रे
     
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे