Bhimravanni deshavarti prem alaukik kele bhimgeet lyrics
SONG: BHIMRAVANNI DHESHAVARATI
SINGER: SURESH WADKAR, SUHASINI
MUSIC DIRECTOR: PRABHAKAR DHAKDE
LYRICIST: RANGRAJ LANJEVAR
ALBUM: DEEPSTAMBH-DR.AMBEDKAR GEETE
MUSIC LABEL: T-SERIES
भीमरावांनी
देशावरती प्रेम अलौकिक केले
इतिहासाचे
पान सुवर्णी रंगवून ते गेले
गोलमेज
ही परिषद हि त्यांनी वाणीने गाजविली
मूलभूत
हक्कांची सदनी कैफियत मांडिली
बहिष्कृतांचे
दुःख जगाच्या वेशीवर ठेवियले
इतिहासाचे
पान सुवर्णी रंगवून ते गेले
प्रतिगामी
शक्तींना त्यांनी कडवा विरोध केला
शांतिपथावर
रथ क्रांतीचा हाकीत पुढती नेला
तळागाळातील
दबलेल्याना पंखगती ती दिधली
इतिहासाचे
पान सुवर्णी रंगवून ते गेले
अर्थव्यवस्था
या देशाची सुस्थिर भक्कम व्हावी
दारिद्र्याच्या
रेषेखालील जनता वरती यावी
स्वप्न
गोजिरे भारतभू चे लोचनात रेखियले
इतिहासाचे
पान सुवर्णी रंगवून ते गेले
❤❤❤
More from this Album:
Listen to this song:
1 Comments
Khup sundar. Jaibhim.
ReplyDelete