आचाराविण विचार वाया
आचाराविण विचार वाया, व्यर्थ असे ते ज्ञान
बोध हा बुद्धाचा तू जाण
पंचशील अन प्रज्ञा करुणा
मनुजांचे हे भूषण जाणा
त्रिशरणाला असे जीवनी, आहे अग्रस्थान
अष्टमार्ग हे अतीव सुंदर
अनुपम आहे या अवनीवर
मर्म जाणुनी या मार्गाचे, साधावे निर्वाण
जीव तेवढे समान सारे
मनी असावा भाव असा रे
त्या जीवांचे दुःख हरावे, सेवा हीच महान
बोध हा बुद्धाचा तू जाण
0 Comments